
परभणी : तिसरीही मुलगी झाल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला जिवंत पेटवून दिल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली. या घटनेनंतर महिलेने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र तिला वाचवता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना २६ डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेनंतर मृत तरुणीच्या बहिणीने आपल्या मेहुण्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात कुंडलिक काळे आणि त्यांची पत्नी व मुली राहतात. कुंडलिक काळे यांना पत्नीपासून आधी दोन मुली होत्या. या दोन मुलींनंतर त्यांच्या पत्नीला पुन्हा एकदा मुलगी झाली. त्यामुळे कुंडलिक काळे हे चांगलेच नाराज झाले व संतापले. रागाच्या भरात २६ डिसेंबरच्या रात्री त्यांनी पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा मृत्यू झाला.