मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी; राज्यात नव्या वादाला सुरुवात

भाजपचे नेते आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका होऊ लागली आहे
मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी; राज्यात नव्या वादाला सुरुवात

एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरु असताना भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम सुरु असताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्यात कैद करुन ठेवले होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण तेदेखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले." यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

विरोधीपक्ष नेते अजित पवार टीका करताना म्हणाले की, 'या वाचाळवीरांना यावर. एकाला ठेच लागल्यानंतर दुसरा शहाणा होतो. पण यांच्यामध्ये स्पर्धाच लागली आहे. महाराजांची तुलना कधी होऊ शकते का?' असा सवाल केला. तर, आदित्य ठाकरे यांनी टीका करताना म्हंटले की, ते चुकून बोलले की ओघात बोलून गेले हे मला पटण्यासारखे नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराजांचा अपमान हा भाजपचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in