कोकणच्या राजाची लासलगावमार्गे अमेरिकावारी; पहिल्याच दिवशी २८ टन आंबे अमेरिकेला रवाना

कोकणच्या राजाची लासलगावमार्गे अमेरिकावारी; पहिल्याच दिवशी २८ टन आंबे अमेरिकेला रवाना

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून आज २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे. मागील वर्षी एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक मधून झाली होती

लासलगाव : येथील भाभा अणू संशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिलपासून आंबा निर्यातीला सुरुवात झाली असून ७५०० बॉक्समधून २८ टन आंबा यूएसएला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषक चे अधिकारी संजय आहेर यांनी दिली. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.

जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून आज २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे. मागील वर्षी एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक मधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका,ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहेत.

लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.

लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता कांद्याबरोबर मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

विकिरण प्रक्रिया?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० मात्रा ग्रे विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची प्रक्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निर्मितीची प्रक्रिया ही थांबते. कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in