मनीष नांदगावकर सरपंचपदावरून बडतर्फ

मु‌रूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर हे उसरोली ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच होते.
मनीष नांदगावकर सरपंचपदावरून बडतर्फ

मुरूड-जंजिरा : मु‌रूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर हे उसरोली ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच होते. काही महिन्यापूर्वी सरपंच मनीष नांदगावकर हे लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले होते. त्यामुळे पदाचा दुरुपयोग केला म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे न्यायालयात रीतसर अपील दाखल केले होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) नुसार त्यांना सरपंच पदावरून दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यावर कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सरपंच मनीष महादेव नांदगावकर यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मनीष नांदगावकर हे सरपंच पदावर असताना तक्रारदार मोहन दत्तात्रेय पाटील यांच्याकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली होती. या प्रकरणात लाचलुचपत पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले होते. लाचेची रक्कम नांदगावकर यांच्याकडून हस्तगत करून जप्त करण्यात आली होती. ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर याबाबत २६ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात येऊन अलिबाग येथील विशेष न्यायालयाकडून दोन दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आली होती. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच यांनी कर्तव्यात कसूर केली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे आपला अर्ज सादर केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in