पुणे महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे निश्चित; उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर

बिनविरोध निवडणुकीची शक्यता असल्याने आता महापौरपदाची निवडणूक केवळ औपचारिकता राहिली असल्याचे मानले जात आहे.
पुणे महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे निश्चित; उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर
(Photo-X)
Published on

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांचे नाव अंतिम रूपात निश्चित करण्यात आले आहे. बिनविरोध निवडणुकीची शक्यता असल्याने आता महापौरपदाची निवडणूक केवळ औपचारिकता राहिली असल्याचे मानले जात आहे. उपमहापौरपदासाठी आरपीआय आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांचे नाव निश्चित झाले आहे.

मंजुषा नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या असून, सिंहगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत महापौरपदासाठी तीन नावे अंतिम केली गेली होती. अर्ज दाखल होण्यापूर्वीच भाजपकडून मंजुषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले. महापालिकेत भाजपने ११९ जागांवर विजय मिळवला असल्याने महापौर भाजपकडून निश्चित होणार आहे. महिला गटासाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले होते.

पुणे शहराचा विकास या शहराला साजेसा करुन दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. काम करण्याची संधी मिळाल्यास ती सोने करेन. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञ आहे. पुणे सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर आहे; याचे श्रेय जुने नेते आणि वडिलधाऱ्यांना देईन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम करायचे होते; त्यांची शिस्त आणि मार्गदर्शन खूप कमी जाणवत आहे.

मंजुषा नागपुरे

logo
marathi.freepressjournal.in