मनोज जरांगेंच ९ व्या दिवशीही उपोषण सुरुच ; प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथक दाखल

उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पातळी कमी झाल्याने त्यांना सलाइन लावण्यात आलं
मनोज जरांगेंच ९ व्या दिवशीही उपोषण सुरुच ; प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथक दाखल

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होते ."तुम्ही म्हणाल ते करतो आधी अध्यादेश काढा. आम्ही ओबीसीमध्ये आहोत. तरी आरक्षणापासून आम्हाला दूर ठेवले. आता चार दिवस देतो. मला अध्यादेश द्या, मला फोनवर कळवा. मी समाजाला शब्द दिला आहे. सात वर्ष आमची जात बाहेर राहली. ४ फेब्रुरवारीपासून आमचे उपोषण सुरु आहे. अजून ४ दिवस सरकारला देतो." असा अल्टीमेटम जरांगे यांनी राज्य सरकाला दिला होता.

दरम्यान, सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणानंतर आज जरांगे यांची तब्येत खालावली असून जरांगे पाटील यांच्यावर ताबोडतोब उपचार केला जात आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या अनेक माणसानांनी येऊन मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. थोड्या दिवसाआधीचं राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगत एक महिन्याचा वेळ मागितला होता.

मात्र, एक महिन्याचा वेळ कशाला हवा तुम्हला ? चार दिवसाचा वेळ पुरेसा आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाचा आदेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे यांच्या उपषोणाचा आज ९वा दिवस असून त्यांची तब्येत खालवल्याने वैद्यकीय पथक उपोषनस्थळी दाखल झालं आहे. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पातळी कमी झाल्याने त्यांना सलाइन लावण्यात आलं. मनोज जरांगे मागील ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत त्यांनी हे उपोषण मागे घ्याव यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in