Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता ; मनोज जरांगे म्हणाले, "इतकी फेकाफेकी...."

एकनाथ शिंदे जालन्यात मनोज जरांगेंची भेट घेवून त्याचं उपोषण सोडणार होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने जरांगेंनी खास शैलीत टीका केली.
Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता ; मनोज जरांगे म्हणाले, "इतकी फेकाफेकी...."
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांसह आज(१३ सप्टेंबर) सांयकाळी ५ वाजता जालन्यातील अंरवाली सराटी(ता. अंबड) गावात जाणार होते. यावेळी ते मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची भेट घेवून त्याचं उपोषण सोडणार होते. तसा त्यांचा दौराही आला होता. परंतु आता त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असल्याने मनोज जरांगे यांनी त्यांच्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी मनोज जरांगेंनी समितीसाठी एक महिन्याचा वेळ द्यावा, असी मागणी केली. यावर जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन खात्रीशीर शब्द दिला तर उपोषण मागे घेण्याबाबत विचार करु असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी राज्य सरकारसमोर पाच अटी देखील ठेवल्या होत्या.

मनोज जरांगे यांची मागणी नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांसह जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडतील असं सांगण्यात आलं होतं. त्याबाबचा दौरा देखील आला होता. मात्र, आता ऐनवेळी मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यावर जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीका केली.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री येतील, असं मला वाटत आहे. मुळात ते येणार आहेत. ते येणार असल्याचं मला अधिकृतपणे कोणीही सांगितलं नव्हतं. मात्र सकाळपासून ते येणार असल्याच्या बातम्या ऐकतोय. ते पुढे म्हणाले की, अर्जुन खोतकर कारखान्याकडे रिसिव्ह करायला जातोय असं म्हणून निघाले आहेत. ते मुख्यमंत्र्यांना आणायला गेले असतील असं वाटतंय. पण तरीही असं अचानक दौरा रद्द होत असेल तर माझ डोकं बंद पडायचं काम झालंय, असं ते म्हणाले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मला जास्त राजकारण कळत नाही, इतकी फेकाफेकी मी बघीतली नाही. राजकारणात गोम असते....हे लोक शेंगा हाणत आहेत...तरीही मुख्यमंत्री येथील असा मला विश्वास आहे. असं जरांगे पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in