मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस घेवून मनोज जरांगे उपोषण मागे ; साखळी उपोषण मात्र सुरुच असणार

पुढील चाळीस दिवस याच ठिकाणी साकळी उपोषण केलं जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस घेवून मनोज जरांगे उपोषण मागे ; साखळी उपोषण मात्र सुरुच असणार

जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अमरण उपोषण सुरु होते. आज (१४ सप्टेंबर) गुरुवार रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन हे उपोषण सोडण्यात आलं. असं असलं तरी पुढील चाळीस दिवस याच ठिकाणी साकळी उपोषण केलं जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजरन, मंत्री संदिपान भूमरे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांची उपस्थिती होती.

मराठा समजाला आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे हे मागील सतरा दिसांपासून अमरण उपोषण सुरु होतं. जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री हे बुधवारी अंरवाली सराटी गावात येणार होते. मात्र, ते न आल्याने उपोषण लांबलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यासह उपोषणकर्ते जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन आमरण उपोषण सोडवलं.

राज्य सरकार मराठ्यांना कायम स्वरुपी आरक्षण देण्यास ठाम आहे. फडणवीस सरकारने यापूर्वी देखील आरक्षण दिलं होतं. मात्र ते सुप्रीम कोर्टात दिलं नाही. तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून सेवा निवृत्त न्यायाधीश यांची समिती स्थापन केली आहे. मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करण्यासाठी ही समिती करत आहे. तुमच्याकडील देखील नोदी द्या. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा समजााला त्यांचा अधिकार मिळेल. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ठाम असून कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं शिंदे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी तीन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला ३० दिवसांचा वेळ देत आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यासह जालन्यातील अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून जरांगेंना फळाचा रस देत त्यांच उपोषण मागे घेतलं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रोटोकॉल तोडून भेट दिल्याने त्यांना आणखी दहा दिवस वाढवून देण्यात आले आहेत. शासनाने गठीत केलेल्या समितीत आमचा सदस्य जाणार नाही. आता पुढे साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in