Manoj Jarange: "थोडा दम धरा...", प्रसाद लाड यांच्या टीकेला मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

तुम्ही लेकरू लेकरु म्हणत राजकीय ढेकरू द्यायला लागला आहात. देवेंद्र फडणवीस विरोधात बिलकूल भाष्य करु नका, असं प्रसाद लाड म्हणाले होते
Manoj Jarange: "थोडा दम धरा...", प्रसाद लाड यांच्या टीकेला मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

मराठा आरक्षणावरुन राज्याचं वातावरण तापलं आहे. राज्यात मराठा विरुद्ध असं वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली जात आहे. मनोज जरांगे यांनी २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास ते सरकारला परवडणार नाही, अशा शब्दात इशारा दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जहरी टीका करायला सुरुवात केली आहे. तुमच्या मनात काही विषारी विचार असेल तर मराठा नेत्यांच्या डोक्यात घाण ओतू नका. त्यांच्या माध्यमातून मराठ्यांमधघ्ये कहल लावू नका, अशी टीका जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

तुम्ही लेकरू लेकरु म्हणत राजकीय ढेकरू द्यायला लागला आहात. देवेंद्र फडणवीस विरोधात बिलकूल भाष्य करु नका, असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तुमचा राजकीय बोलविता धनी कोण आहे? हेही आम्हाला माहिती आहे. अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. आता मनोज जरांगे-पाटील यांनी लाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, "२४ डिसेंबरपर्यंत थांबा, आमचा बोलविता धनी कोण आहे? हे तुम्हाला कळेल. थोडा दम धरा..." अशा शब्दात मनोज जरांगे-पाटील यांनी उत्तर दिलं आहे. यानंतर आता भाजपा नेते आणि मनोज जरांगे यांच्यात नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in