Solapur : माझ्या अटकेचा कट; मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

'मराठा आंदोलनात मला अटक होऊ शकते किंवा माझ्या रॅलीत हल्ला होऊ शकतो.
Solapur : माझ्या अटकेचा कट; मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
Solapur : माझ्या अटकेचा कट; मनोज जरांगे-पाटील यांचा आरोपसंग्रहित छायाचित्र
Published on

सोलापूर : 'मराठा आंदोलनात मला अटक होऊ शकते किंवा माझ्या रॅलीत हल्ला होऊ शकतो. मला पहाटे ५ वाजता कळले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात कट रचला आहे, फडणवीस हे शेवटचा डाव आखत आहेत', असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला. माझ्या रॅलीवर दगडफेक, रॅलीवर हल्ला होऊ शकतो. बंदोबस्त काढला जात आहे आणि मला अटक करण्याचा प्रयत्नही केला जात आहे', असे ते म्हणाले.

कुणबी प्रमाणपत्र हे जात पडताळणी कार्यालयात रद्द होत असल्याने राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. शनिवारी दुपारी जरांगे हे सोलापूर शहरात आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

२९ तारखेला दाखवणार

फडणवीस यांचे सर्व डाव फसले आहेत, म्हणून ते शेवटचा डाव आखत आहेत, 'मी खोटं कधीच बोलत नाही. फडणवीस यांना वाटू लागलंय, ते मोठ्या संख्येने निवडून आले आहेत, त्यामुळे मी काहीही केलेले चालेल. फडणवीस यांनी समजून घ्यावे, की आपण 'मराठा' मतांमुळे निवडून आलो आहोत, आता २९ तारखेला आम्ही ताकद दाखवणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

बावनकुळेंवर टीका

चंद्रशेखर बावनकुळे थेट पत्र लिहितात की कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, याबाबत जरांगे पाटील यांनी दहीहंडे आणि बोडके यांची रद्द झालेली शासकीय कागदपत्रे दाखवली. रद्द झालेली प्रमाणपत्रे दुरुस्त करून द्या अन्यथा रान उठवणार, एकाही मराठ्यावर अन्याय झाला, तर सहन केला जाणार नाही. नऊ जिल्ह्यांतील ६१ दाखले रद्द करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in