जरांगे-पाटील रुग्णालयात; डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे-पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे करीत आहेत. वाढत्या तापमानाचा त्यांना त्रास होऊन प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जरांगे-पाटील यांना अशक्तपणा जाणवत असून त्यांना ताप आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. जरांगे-पाटील यांना रुग्णालयात काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in