मनोज जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा समाजाच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा समाजाच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीत २८८ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा इशाराही दिला आहे. मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या अधिसूचनेचा मसुदा जारी करण्यात आला होता त्याची अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे कुणबींना मराठा अशी ओळख देण्याबाबतचा कायदा करावा, अशा मागण्या जरांगे यांनी केल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून त्याला जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मराठा समाजाला इतर मागासवर्ग दर्जा द्यावा आणि सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, अशा जरांगे यांच्या मागण्या आहेत.

मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. आंतरवाली सराटीमधील नागरिकांना भडकावून राज्य सरकार आंदोलन थोपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in