मनोज जरांगे ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. मराठा आरक्षण प्रमाणपत्रे आणि कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांबाबत विद्यार्थ्यांना व उमेदवारांना येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे.
मनोज जरांगे ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर
मनोज जरांगे ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर
Published on: 

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला संबंधित मागण्यासाठी काहीकाळ अवधी दिला आहे. मात्र, राज्यातील मराठा बांधवांच्या आरक्षण प्रमाणपत्राच्या समस्या आणि कुणबी कास्ट व्हॅलिडीटीच्या अडचणींशी अद्यापही विद्यार्थ्यांना, उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या ७ डिसेंबरपासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे.

मनोज जरांगे ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर
आमचा कोणताही गट नसून आम्हीच पूर्ण पक्ष; खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

जरांगे राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देणार असून प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस देण्यात येणार आहे. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम १ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही, यासह प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या विविध अडचणी जरांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जाणून घेणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)