Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा ; पेटून उठण्याचं आवाहन करत म्हणाले...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा ; पेटून उठण्याचं आवाहन करत म्हणाले...

अहमदनगरमधील चौंडी येथे आयोजित धनगर मेळावा कार्यक्रमात मनोज जरांगे हे बोलत होते.
Published on

मराठा आरक्षणाच्या मुद्दा पेटलेला असताना राज्यातीत धनगर समाजाने देखील आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला होता. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीच त्यांनी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे. तसंच धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील जरांगे यांनी दिलं आहे. चौंडी येथे आयोजित धनगर मेळावा कार्यक्रमात मनोज जरांगे हे बोलत होते.

या मेळाव्यात बोलताना जरांगे म्हणाले की, तु्म्ही डोंगरात, दरीत, पाण्यात पावसात मेंढर चारता. तुमचं आमचं स्वप्न एकचं आहे की, माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नको. पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षणापायी स्वप्न भंग होतात. रात्रंदिवस कमावलेला पैसा जातो. आमचा मराठा समाज देखील उस तोडायचा. रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा. आपल्या दोघांचं दुखणं एकचं आहे.

सर्व पक्षांवर टीका

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी सर्व पक्षांवर टीका केली. पडलेलं सरकार म्हणतं की मी निवडून आलो की लगेच आरक्षण देतो. मग पडलेलं निवडणूक आलं की दुसरं पडलेलं म्हणतं की चारचं दिवसांत देतो. फक्त मोगलाई येऊ दे. अरे तुमचे सत्ता येते केव्हा? आम्हाला किती दिवस फिरवणार?, असा सवाल करत त्यांनी सर्वपक्षियांवर टीका केली. नुसतं भाषणं ठोकून काही उपयोग नाही, असंही ते म्हणाले.

पेटून उठण्याचं केलं आवाहन

धनगर बांधवांचा व्यवसाय शेती आहे. तुम्ही धनगर घटनेत असून तुम्हाला आरक्षण कसं देत नाहीत? तुम्हाला तुमच्या लेकराबाळांचं चांगलं करायचं असेल तर तुम्हालाच पेटून उठावं लागेल. तुम्ही एसटी आहात, तुम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे. तुम्ही घर न् घर जागं करा. आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत, असं विश्वास त्यांनी धनगर समजाला दिला.

logo
marathi.freepressjournal.in