जरांगेंची मोर्चेबांधणी; १२ सप्टेंबरला मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन, पोलीस कारवाई झाल्यास '१० मिनिटांत महाराष्ट्र बंद'

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी मराठा समाजाला १२ सप्टेंबर रोजी जालन्यात मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शांततापूर्ण मार्गाने येणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्यास अवघ्या १० मिनिटांत ‘महाराष्ट्र बंद’ झाला पाहिजे, असा इशाराही दिला आहे.
जरांगेंची मोर्चेबांधणी; १२ सप्टेंबरला मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन, पोलीस कारवाई झाल्यास '१० मिनिटांत महाराष्ट्र बंद'
जरांगेंची मोर्चेबांधणी; १२ सप्टेंबरला मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन, पोलीस कारवाई झाल्यास '१० मिनिटांत महाराष्ट्र बंद'X
Published on

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी मराठा समाजाला १२ सप्टेंबर रोजी जालन्यात मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शांततापूर्ण मार्गाने येणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्यास अवघ्या १० मिनिटांत ‘महाराष्ट्र बंद’ झाला पाहिजे, असा इशाराही दिला आहे.

अंतरवाली सराटी गावात रांगे यांनी आरोप केला की, राज्य सरकारमधील मंत्री मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी संगनमत करत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना ठिकठिकाणी रोखण्याची योजना प्रशासन आखत असल्याचा दावाही त्यांनी केला.

काही मंत्री एकत्र येऊन हे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. पुणे, ठाणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील मराठा बांधवांनी १२ तारखेला आंतरवली सराटी येथे मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. आत्ताच अंतरवाली सराटीला येऊ नका, पण १२ सप्टेंबरला एकही मराठा मागे राहता कामा नये, असे ते म्हणाले.

२९ ऑगस्टपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला बसलेले जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. यामध्ये हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करणे तसेच पात्र मराठा बांधवांना 'कुणबी' जात प्रमाणपत्रे देण्याचा समावेश आहे. कुणबी हा पारंपारिक शेती करणारा समाज असून तो ओबीसी प्रवर्गात येतो, ज्यामुळे त्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो.

महाराष्ट्र बंद

चालू उपोषणादरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी जास्त गर्दी करू नका, असे सांगतानाच १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीकडे येताना पोलिसांनी त्रास दिल्यास संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पोलिसांनी आंदोलकांना त्रास दिला तरी आपण कोणतीही अडचण निर्माण करणार नाही. परंतु, एकाही आंदोलकाचे रक्त सांडल्यास अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

ओबीसींचे प्रतिआंदोलन

जालन्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळाजवळ प्रति-उपोषण सुरू करणाऱ्या चार ओबीसी कार्यकर्त्यांना पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत सोमवारी ताब्यात घेतले. अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर या चार ओबीसी कार्यकर्त्यांनी रविवारी आपले उपोषण सुरू केले होते. राज्य सरकार उपोषणाला बसलेल्या जरांगे यांना 'विशेष वागणूक' देत आहे आणि ओबीसी हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप या आंदोलकांनी केला होता.

दोन समाजांमधील तणाव वाढण्याची शक्यता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता पोलिसांनी या ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तसेच, या उपोषणासाठी ग्रामपंचायत किंवा संबंधित जागेच्या मालकाची परवानगी नसल्याचेही आंदोलकांना पूर्वकल्पना देऊन स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश सासाने, विठ्ठल तालेकर, बाबासाहेब बटुले आणि सतीश कुलाल या चार ओबीसी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in