मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. मनोज जरांगे समर्थक आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड समर्थक यांच्यातील हे संभाषण आहे, असा दावा केला जात आहे.
मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी
संग्रहित छायाचित्र
Published on

बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. मनोज जरांगे समर्थक आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड समर्थक यांच्यातील हे संभाषण आहे, असा दावा केला जात आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याचे नाव घेण्यात आले आहे. कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या समर्थकाला बोलत आहे. त्यात तो मनोज जरांगे यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देतो. त्याचबरोबर पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड ही नावे घ्यावयाची नाहीत अन्यथा तुलाही जीवे मारतो,अशी जरांगे समर्थकालाही जीवे मारण्याची धमकी कराड समर्थक देतो, असे या रेकॉर्डिंगमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in