"नेत्यांच्या फराळा जाऊच नका, १ डिसेंबर पासून...", मनोज जरांगे पाटील याचं मराठा समाजाला आवाहन

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
"नेत्यांच्या फराळा जाऊच नका, १ डिसेंबर पासून...", मनोज जरांगे पाटील याचं मराठा समाजाला आवाहन

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला आरक्षणा मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडत सरकारला ४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं. १ डिसेंबरपासून सर्वांनी साखळी उपोषण करायचं आहे. राज्यभरात सर्वांनी शांततेत आंदोन करा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मराठा समाजाला आवाहन करताना मनोज जरांगे पाटील म्हमाले की, राज्यातील मराठा समाजाने जीवंत राहून लढलं पाहिजे. गोरगरिब मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढा. कुणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा, साखली उपोषण ताकदीने उभा राहिलं पाहिजे. आपल्या जिल्हात प्रत्येकाने जाऊन सांगा. १ डिसेंबर रोजी प्रत्येकाने साखळी उपोषण करा. तसंच जर तुम्ही नेत्यांच्या घरी फराळासाठी जाणार असाल तर तुम्ही त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं हे विचारा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आजपासून तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी उभं रहा, असं नेत्यांना सांगा. तुम्ही पक्षाला नेत्याला मोठं करण्यासाठी पोरांचं वाटोळं करुन घेऊ नका. नेत्यांच्या फराळाला जाऊच नका, असं वाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलं. आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत. त्यांच्यातील नेत्यांच्या विरोधात आहोत. समाजाच्या विरोधात नाही, असं देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in