राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली; जरांगेंचा २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा इशारा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर मराठा समाजाशी केलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला असून येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत नव्याने उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी राज्य सरकारवर मराठा समाजाशी केलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला असून येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईत नव्याने उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. जरांगे यांनी याआधी अनेक वेळा उपोषण करत सर्व मराठा समाजाला 'कुणबी' म्हणून मान्यता द्यावी, ही मागणी लावून धरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in