"...तर त्यांना लगेच फोन करतो किंवा उचलतो", मनोज जरांगेंनी सांगितलं गिरीश महाजन यांचा फोन न उचलण्याचं कारण

मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला होता. परंतु, जरांगे पाटील यांनी महाजनांचा फोन उचलला नसल्याचं सांगितलं जात आहे.
"...तर त्यांना लगेच फोन करतो किंवा उचलतो", मनोज जरांगेंनी सांगितलं गिरीश महाजन यांचा फोन न उचलण्याचं कारण

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी(२४ ऑक्टोबर) रोजी संपली आहे. त्यामुळे जरांगे यांनी आता राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला होता. परंतु, जरांगे पाटील यांनी महाजनांचा फोन उचलला नसल्याचं सांगितलं जात आहे. आता जरांगे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काही वेळापूर्व मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी माझ्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहे. काही वेळाने पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका मांडेन, तसंच आंदोलनाची पुढली दिशा सर्वांना सांगेल. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल. परंतु, ते आंदोलन सरकारला पेलवणार नाही.

यावेळी जरांगे यांनी गिरीश महाजन यांनी केलेल्या फोन बाबत विचारले असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, त्यांच्याकडे आरक्षणाबाबतचं पत्र नसणार, शासनाने काढलेला जीआर तर नसणारचं नसणार. त्यांनी फोन केला त्यावेळी माझा फोन मित्राकडे होता. मी लोकांमध्ये होतो. नंतर मित्राने सांगितल्यावर मी परत गिरीश महाजन यांना फोन केला. परंतु, त्यांनी उचलला नाही. तसंच त्यांच्याकडून परत फोन आला नाही. ते पुढे म्हणाले की, ते कायदा पारित केला म्हणून सांगणार आहेत का? तसं असेल तर लगेच फोन उचलतो किंवा करतो.

logo
marathi.freepressjournal.in