छगन भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल; म्हणाले, "आम्ही ओबीसी बांधवांबद्दल..."

छगन भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल? मनोज जरांगेंचा सवाल; म्हणाले, "आम्ही ओबीसी बांधवांबद्दल..."

छगन भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल, असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. मला गोळी मारली जाऊ शकते असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी भर सभागृहात केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

गावागावात आंदोलन उभं करायचं, कोयत्याची भाषा करायची आणि तुला कोण गोळी मारणार, कोणता पोलीस आहे तो सांगणारा, छगन भुजबळ काहीही वक्तव्य करत आहेत. माझ्या जीवाला धोका असल्याचं सांगून गुन्ह्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न भुजबळांकडून केला जातोय, हेच देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही.सरकारही भुजबळ यांना घाबरतं. भुजबळ हे मंत्री असून त्यांनी चांगलं बोलावं. मराठ्यांबद्दल राग व्यक्त करु नये. आम्ही ओबीसी बांधवांबद्दल एक शब्द तरी काढतो का? मी भुजबळांवर आयुष्यभर बोलणार, त्यांना सुट्टी नाहीच, असा इशारा देखील जरांगे यांनी यावेळी दिला. तसंच भुजबळ यांचं वय झाल्यानं ते काहीही बोलत आहेत. त्यांना काहीही कळत नाही, असं देखील ते म्हणाले.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांची घरे जाळण्यात आली. कुणीही बीडला जायला तयार नाही, आमचं सुद्धा हेच होईल, कुणी यावं अशी अपेक्षा नाही. माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याबद्दल विचारल्यावर पोलिसांनी "तुम्हाला गोळी मारली जाईल असा अहवाल आलाय", असं सांगितलं. मारा, हरकत नाही..मी मरायला तयार आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या. ही झुंडशाही थांबवा, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in