मनोज जरांगेंची शनिवारी साताऱ्यात रॅली

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्यात रॅली काढणार असून, त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जिल्ह्यात तालुका, गावनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत.
मनोज जरांगेंची शनिवारी साताऱ्यात रॅली
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्यात रॅली काढणार असून, त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जिल्ह्यात तालुका, गावनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येऊन ही रॅली यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनासाठी संगमनगर येथील स्वराज्य सांस्कृतिक भवन येथे जिल्ह्यातील आयोजक, आंदोलनकर्ते, मराठा सेवकांची बैठक पार पडली.

त्यावेळी सर्वांनी एकमताने निर्धार केला. यावेळी सातारा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण, कराड, मायणी येथील मराठा सेवकांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गावनिहाय मराठा बांधवांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्यात यावी, यासाठी मराठा बांधवांनी आपआपल्या भागाचा डेटा तयार करावा, असे निर्देश देण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in