"मला अटक झाली तर सरकारला...",अटकेबाबतच्या चर्चेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

बीड हिंसाचार प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना देखील अटक होई शकते असं बोललं जात आहे.
"मला अटक झाली तर 
सरकारला...",अटकेबाबतच्या चर्चेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया
Hp

मराठा आंदोलन तापलं असताना काही दिवसांपूर्वी बीड आणि माजलगावमध्ये मोठा हिंसाचार घडला होता. संतप्त झालेल्या आंदोलकांनी काही आमदारांच्या घरासह मालमत्ता पेटवल्या होत्या. या प्रकरणावरून पोलिस अॅक्शनमोडवर आले असून याप्रकरणी काही जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर काही आंदोलक हे पोलिसांच्या रडावर आहेत. आता बीड हिंसाचार प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना देखील अटक होई शकते असं बोललं जात आहे. यावर आता स्वत: जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घ्यो, असं सरकारने म्हटलं होतं. पण त्यांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यामुळे माझ्या अटकेची शक्यता देखील असू शकते, पण मला अटक करणं सरकारला तेवढं सोपं जाणार नाही. मला अटक करायची असेल तर करु द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नहाी. मला अटक झाल्यावर मराठा समाज काय आहे? हे सरकारला कळेल, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

बीड-माजलगावमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी मराठा आंदोलकांना अटक केली जात आहे. या अटकेबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे. की आंदोलकांची अटक थांबवा, बीडमध्ये जे घडल ते सत्य आहे. त्याचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही. पण तुम्ही निष्पाप लोकांना तुरुंगात टाकलं आहे. तीन-चार हजार लोकांच्या याद्या केल्या आहेत. काही पोलिसांची जात उफाळून आली आहे. पोलिसांना कोणतीही जात नसते आणि नसायलाही पाहिजे. तरच राज्य शांत चालू शकतं. लोकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला नाही पाहिजे."

ते पुढे म्हणाले, माजलगावमध्ये हे सर्रास सुरु आहे. तिथे पोलिसांकडून लोकांबरोबर जातीवाद केला जातोय, हे व्हायला नाही पाहिजे. तेथील आमदारांच्या सांगण्यावरुन कारवाया करायच्याहे चांगलं नाही. उद्या त्यांना मराठ्यांच्याच दारात यायचं आहे. सरकार हे सगळ करत नसेल तर सरकारने हे थांबवायला हवं. कारण गृहमंत्र्यापेक्षा कोणताही पोलीस मोठा असूच शकत नाही. गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकार सांगत आहे. मग तुम्ही आमच्या लोकांना अकट का करत आहात? दोन दिवसांत गुन्हे मागे घेतो, असं आश्वासन सरकारने दिलं होतं. उपोषण सोडून एक महिना झाला पण सरकार काहीच करु शकलं नाही. याचा अर्थ तुम्ही आमच्यावनर कोणता डाव टाकला आहे. तुमचे डाव तुम्हाला परवडणार नाहीत. आम्ही अटक होऊ, तुरुंगात जाऊन बाहेर येऊ पण पुढचे डाव सरकारसाठी अवघड जातील याचा सरकारने गांभिर्याने विचार करायला हवा, असं देखील जरांगे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in