अनेक मोठे नेते भाजपमध्ये येतील -बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वादळ महाराष्ट्रात येईल, तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील
अनेक मोठे नेते भाजपमध्ये येतील -बावनकुळे

प्रतिनिधी/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वादळ महाराष्ट्रात येईल, तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील. काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू आहे. त्यांच्यात अंतर्गत वाद आहे, नेतृत्वात समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही. चव्हाणांनी राजीनामा कोणत्या कारणाने दिला, हे पाहावे लागेल. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असल्यामुळे मोठमोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. पुढच्या काळात आपल्याला अशी खूप प्रकरणे दिसतील, असे मला वाटते. माझ्याकडे याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in