महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले असून मुख्यमंत्री दिल्लीत - संजय राऊत

हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठिंबा आहे आणि त्याला फक्त संजय राऊत नाही तर शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे संजय राऊत म्हणाले
महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले असून मुख्यमंत्री दिल्लीत - संजय राऊत
ANI

शिवसेनेमधील बंडखोरी आणि गळती दिवसेंदिवस वाढत असताना शिवसेनेकडून बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. खासदार संजय राऊत हे त्यांच्या पत्रकार परिषदांमधून शिंदे गटावर सातत्याने आगपाखड करत आहेत. आता त्यांनी महाराष्ट्र पुरात बुडत असताना मुख्यमंत्री दिल्लीत काय करत आहेत, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. शिवसेना सर्व आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असून सध्याचे सरकार कधीही पडू शकते असे देखील राऊत म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना यूपीएसोबत असेल. UPA उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना संजय राऊत उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू किंवा मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणे म्हणजे एनडीए किंवा यूपीएला पाठिंबा देणे नव्हे. आदिवासी समाजात महिलांना संधी मिळत आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यात मोठे योगदान आहे. शेकडो आदिवासी हुतात्मा झाले. हा त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठिंबा आहे आणि त्याला फक्त संजय राऊत नाही तर शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुरात बुडाले असून मुख्यमंत्री दिल्लीत राजकारण करत आहेत. मंत्रिमंडळाचा पत्ता नाही. काल एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. अनेक लोक मरण पावले. अद्याप परिवहन मंत्री नाही. सरकार अस्तित्वात नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in