Maratha Kranti Morcha: मराठा आंदोलनाची झळ अजित पवारांपर्यंत ; माढ्यात दाखवले काळे झेंडे

मराठा आंदोलक अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती.
Maratha Kranti Morcha: मराठा आंदोलनाची झळ अजित पवारांपर्यंत ; माढ्यात दाखवले काळे झेंडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज(२३ ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठल शिंदे सहकाही साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित पवार यांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. अजित पवार शेतकऱ्यांना संबोधिक करण्यासाठी उभे राहिले असता मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. यानंतर २५ तारखेपासून जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील माढा लोकसभा मतदार संघात बंदी घातल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा आंदोलक अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे सभेच्या ठिकाणी कारखाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच सभेच्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे रुणाल आणि मोबाईल फोन तपासूनच प्रवेश देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in