
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत डेरेदाखल झाले असून यात मनोज जरांगे-पाटील यांचा डुप्लिकेट जरांगे आंदोलनात चर्चेत आले आहे.
आंदोलनात काही सोयीसुविधा नसल्याने आंदोलकांनी अर्धनग्न व केस मुंडन करत सरकारचा निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कूच करत थेट आझाद मैदान गाठले. अर्थात राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची अडचण झाली असून आंदोलकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र आझाद मैदान परिसरात शौचालय, खाऊची दुकान बंद असा आरोप आंदोलकांसह मविआच्या नेत्यांनी केला. त्यानंतर तातडीने मुंबई महापालिका प्रशासनाकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी मुंडन केले.