Maratha Reservation :आरक्षणासाठी अजूनं एकानं संपवलं जीवन ; हिंगोलीत तरुणाची आत्महत्या...

एवढेच नव्हे तर लोकं आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल देखील उचलत आहेत.
Maratha Reservation :आरक्षणासाठी अजूनं एकानं संपवलं जीवन ; हिंगोलीत तरुणाची आत्महत्या...

मराठा आरक्षणासाठी राज्यात वणवा पेटला आहे. संपूर्ण राज्यभरात जाळफोड, तोडफोड, उपोषण,प्रचार आणि मोर्चे सुरु आहेत. एवढेच नव्हे तर लोकं आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल देखील उचलत आहेत. तरी सरकारनं अद्यापि काही ठोस निर्णय घेतला नाही आहे. दरम्यान राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत अधिकच वाढ होत आहे. अशातच आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. नहाद गावातील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय गोविंद कावळे या तरुणानं चिठ्ठी लिहतं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे, असं सांगितलं आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत त्यानं उडी मारली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत म्हटलं आहे की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या पोलीस ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

जरांगे यांनी मराठा समाजाला वारंवार सांगत आले आहेत की, आत्महत्या करू नका, एकजुटीनं राहा, तोडफोड करू नये उपोषण करा शांततेच्या मार्गाने आपल्याला आरक्षण हवे आहे, तरीही मराठा समाज निराश होऊन टोकाचं पाऊल उचलत आहे.

logo
marathi.freepressjournal.in