Maratha Reservation:"उच्च शिक्षण असून देखील...", सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आदिनाथ राखोंडे (वय 27 वर्षे) असं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Maratha Reservation:"उच्च शिक्षण असून देखील...", सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यात गेल्या अनेक महिण्यापासून आंदोलन सुरु आहे. लोक उपोषण मोर्चे त्याचबरोबर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्यांचं चक्र काही केल्या थांबायला तयार नाही. हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं आहे.

या तरुणाने स्वतःच्या घरातील विजेच्या तारांना पकडून आत्महत्या केली आहे. तसंच त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. ज्यात, त्याने मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय? असा त्याने उल्लेख केला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आदिनाथ राखोंडे (वय 27 वर्षे) असं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील आजरसोंडा येथील 27 वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी विजेच्या ताराला स्पर्श करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य राखोंडे असं मयत युवकाचे नाव असून, तो एक उच्चशिक्षित होता. मात्र,असं असतांना देखील त्याला नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदित्यचा सहभाग होता.

सुसाईड नोट लिहून आत्महत्या

एक मराठा लाख मराठा...मी सतत बातम्या पाहत आहे व मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊन सुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे.

मनोज जरांगे-पाटील हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा तिसऱ्या टप्यात राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा होणार आहे. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे-पाटील हे आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असं आवाहन करणार आहेत. जरांगे यांनी याआधी देखील आहत्मत्या करू नका असं आवाहन केलं होत. मराठा समाजाने एकत्र या एकजुटने हा लढा लढू असं मनोज जरांगेचं मत आहे. तरी देखील काही तरुण हे टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in