Maratha Reservation: हिंगोलीच्या खासदांरानी दिला राजीनामा ; मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा...

मी गेले अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा एक कार्यकर्ता आहे
Maratha Reservation: हिंगोलीच्या खासदांरानी दिला राजीनामा ; मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा...

राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा चांगलाचं पेटला आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. राज्यात सगळीकडे अंदोलन, मोर्चे आणि प्रचार सुरुचं आहेत. पण अद्यापि सरकारनं काही निर्णय दिला नाही . राज्यातील आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांविषयी मराठा समाजाच्या मनामध्ये तीव्र भावना आहेत. अशातच, आता हिंगोलीच्या खासदारांनी त्याच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. हेमंत पाटील यांनी पत्रामध्ये म्हटलंय आहे की, महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. आरक्षणाच्या या विषयावर मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. मी गेले अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी भांडणारा एक कार्यकर्ता आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा आहे म्हणून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

असं पत्र लोकसभा अध्यक्षांच्या नावे रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी लिहिलं आहे. मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर त्यांनी त्याच्या राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in