Maratha Reservation:मराठा तरुणाच्या आत्महत्येवर जरांगे पाटील आक्रमक ; सरकारला इशारा देत म्हणाले...

मराठा आक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील एका युवकाने सुसाईड नोट लिहून मुंबईत आत्महत्या केली आहे. यावरुन राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
Maratha Reservation:मराठा तरुणाच्या आत्महत्येवर जरांगे पाटील आक्रमक ; सरकारला इशारा देत म्हणाले...

मराठा आक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील एका युवकाने सुसाईड नोट लिहून मुंबईत आत्महत्या केली आहे. यावरुन राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता मराठा आरक्षणासाठी उपोषणासाठी आंदोलन करणाने मनोज जरांगे पाटील यांना सरकारला अल्टीमेटम दिला आहे. सरकारनं आता हे बलिदान वाया जाऊ देऊ नये, तातडीने आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "सरकारनं मराठा आंदोलकांचे बळी घ्यायचं का ठरवलं कळत नहाी. सरकारमुळे आमचे बळी पडायला लागलेत, मराठा समाजाला मी हातपाय जोडून आवाहन करतो की आपल्याला आरक्षण मिळणार आहे. आपण घेतल्याशिवया सोडणार नाही."

आपण खूप वर्षे दम धरला आहे, थोडे दिवस आणखी दम धरा. जर मुलंच कमी व्हायला लागलवे तर आरक्षण घेऊन काय उपयोग? हे सर्व सकाराचं पाप आहे. सरकालला किती मुडदे पाडायचे आहेत. सरकारनं आता तरी त्या भावांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. आता तातडीने मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय घ्यावा. २४ तारखेनंतर होणारं शांततेचं आंदोलन सरकारला परवडणारं नाही. आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in