Maratha Reservation:मनोज जरांगेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार तयारी

कल्याण पुर्वेत लागेल्या सभेच्या बॅनरवर खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटा लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Maratha Reservation:मनोज जरांगेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार तयारी

राज्यांत मराठा आरक्षणासाठी जागोजागी प्रचार, आंदोलन सुरुचं आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर आत मनोज जरांगे-पाटील यांनी संपूर्ण राज्यभरात दौरे व सभा घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संध्याकाळी जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली.

त्या परिसरात सगळीकडे झेंडे, बॅनर लावण्यात आले असून बॅनर हा आता चर्चेचा विषय बनला आहे. त्याच कारण असं की, कल्याण पूर्व भागात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे काही बॅनर लागले आहेत. यावर चक्क मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे,शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक यांचे देखील फोटो आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला शिवसेना शिंदे गटाचा पाठींबा आहे कां? असा प्रश्न आता यावेळी उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जरांगे यांची आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याशिवाय पोलिसांचा देखील परिसरात चोख बंदोबस्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in