Maratha Reservation Protest: मराठा समाज आक्रमक! मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडवला

यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरिता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Maratha Reservation Protest: मराठा समाज आक्रमक! मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडवला

राज्यातील मराठा समज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय लातूर जिल्ह्यातील वाढवणा या गावाने घेतला आहे. लातूरच्या उद्गगीर मतदार संघातील हे गाव असून कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा हा मतदार संघ आहे. संजय बनसोड हे आज या गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलकांनी हा ताफा अडवला. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरिता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आपल्या आपल्या तीव्र भावना कॅबिनेट मंत्री संजय बनसोडेंसमोर मांडल्या.

चिमाची वाडी गावात एका कार्यक्रमासाठी जात असताना कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे आज वाढवण पाटीवर आले असताना मराठा आंदोलकांनी हातात भगवे झेंडे घेत त्यांचा ताफा अडवला. यावेळी पोलिसांनी संरक्षण कवच तयार करत बनसोडे यांच्या कारला संरक्षण दिलं. मात्र, आंदोलकांची घोषणाबाजी सुरु असताना संजय बनसोडे हे आपल्या गाडीतून उतरले आणि त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आमचे लोकप्रतिनिधी बना, अशी मागणी संजय बनसोडे यांच्याकडे आंदोलकांनी केली. आंदोलकाच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले की, मी मंत्री नसतो आणि आरक्षण कमिनीमध्ये नसतो तर भगवी टोपी घालून मी देखील तुमच्याबरोबर राहिलो असतो. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच आरक्षण कमिटी हे १०० टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने काम करत आहे. मी देखील तुमच्याच बाजूने आहे, असं सांगत त्यांनी आंदोलकांना विश्वास दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in