Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या; राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन

मराठा समाजाला आरक्षण लवकर द्या, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असं कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या;  राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन

राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी लोकं प्रचार , मोर्चे आणि साकळी उपोषण करत आहेत. एवढेच नव्हे तर काहींकडून आत्मत्यासारखं टोकाचं पाऊल देखील उचललं जात आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आत्महत्यांचं चक्र सुरूच आहे. अशातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात सोमेश्वर गावातील 9 वीत शिकणाऱ्या विध्यार्थीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असं या तरुणीचं नाव आहे. इयत्ता 9 शिकणाऱ्या कोमलने स्वतःच्या घरात चिठ्ठी लिहून गळफास घेतं आत्महत्या केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण लवकर द्या, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असं कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विध्यार्थीनीचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. त्याच्या घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने हे असे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याने नांदेड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली दाज आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याच्या घटना घडल्या आहेत. असं असतानाच मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आत्महत्या सारख्या घटना समोर येत आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं होतं तरी राज्यात आत्महत्यांचं चक्र सुरूच आहे .

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in