Maratha Reservation:मराठा आरक्षणाची धग पोहचली पुण्यापर्यंत; नवले पुलावर वाहनांच्या लागल्या रांगा....

गाडयांच्या रांगा जवळपास पाच किलोमीटरच्या लागल्या आहेत. त्यामुळे तिथं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Maratha Reservation:मराठा आरक्षणाची धग पोहचली पुण्यापर्यंत; नवले पुलावर वाहनांच्या लागल्या रांगा....

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता खऱ्या अर्थानं चांगलाचं पेटला आहे. राज्यात ठिकठिकाणी प्रचार, मोर्चे आणि जाळफोड सुरु आहे. अनेक आमदारांच्या बंगल्यांना आणि कार्यलयांना मराठा आंदोलकांनी पेटवलं आहे. आता या आंदोलनाची धग पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आदोलकांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवून त्यांनी टायरची जाळपोळ केली आहे. नवले पुलाजवळील वाहतूक देखील पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नवले पुलाजवळ ताबोडतोब पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलक एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा करत आहेत. आंदोलकांनी मुंबई आणि साताऱ्या कडे जाणारी वाहतूक आडवली आहे.

आंदोलनस्थळी वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या ठिकाणी मराठा समाजाच्या तरूणांनी मोठ्या संख्यन गर्दी केली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता बंद केल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या लांब रांग लागल्या आहेत. या गाडयांच्या रांगा जवळपास पाच किलोमीटरच्या लागल्या आहेत. त्यामुळे तिथं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामध्ये शेकडो नागरीक अनेक तासांपासून अडकून पडले आहेत. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका आणि मुलांच्या स्कूलबस देखील अडकल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in