मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात!

सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी अधिकारी येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात!

मुरूड-जंजिरा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुरूड-जंजिरा नगरपरिषदेतर्फे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीव्दारे नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेण्यात सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणात करिता नगरपरिषद कर्मचारी, कृषीविभाग व शिक्षकांमार्फत हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे.

सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी अधिकारी येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी नागरीकांनी सर्वेक्षणाकरिता येणाऱ्या अधिकाऱ्याना आवश्यक ती माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक नोडल अधिकारी पंकज अनिल भुसे यांनी केले होते. त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुरूड तालुक्यात व मुरूड शहरमध्ये मराठा समाज नोंदी शोधण्याचे जोरदार काम सुरू आहे. आमचे तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी लोकांच्या घराघरात पोहचत असून प्रश्नावलीचे उत्तर त्यांच्याकडून घेत आहेत. लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळत असून आमचे कर्मचारी सुद्धा वेगाने काम करीत आहेत. आतापर्यंत मुरूड तालुक्यातील २५ टक्के काम पूर्ण झाले असून मराठा नोंदी शोधण्याचे काम वेगात सुरू आहे.

-रोहन शिंदे, तहसीलदार मुरूड

logo
marathi.freepressjournal.in