मराठा समाज पुन्हा आक्रमक ; विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन

यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
मराठा समाज पुन्हा आक्रमक ; विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन

आरक्षण, ओबीली आरक्षण आणि खोपर्डी घटनेतील आरोपींच्या शिक्षेची अंबलबजावणीसह विविध मागण्यांसाठी मराठी क्राँती मोर्चातर्फे मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी चेंबूरमधील पांजरपोळ सर्कल येथे दाखल झाल्याने शीव-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

नवी मुंबई परिसरातून बुधवारी सकाळी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास आंदोलक चेंबूर पांजरबोल सर्कलजवळ दाखल झाल्याने पोलिसांनी आंदोलनकरत्यांना रस्त्याच्या एका बाजूला उभं राहण्याची विनंती केली. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकरत्यांनी थेट रास्तारोकोच केला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढत रस्ता मोकळा केला. यानंतर आंदोलक मुंबईतील आझाद मैदानाकडे रवाना झाले. या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in