मराठा सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी ब्रेक; सर्व्हर ठप्प, आठ दिवसांच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

राज्यात सर्वत्र सर्वेक्षणाला वेग आला. परंतु या सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी तांत्रिक विघ्न आले असून, अनेक ठिकाणी सर्वेक्षणाचे मोबाईल अ‍ॅपच बंद पडल्याने बराच वेळ सर्व्हर ठप्प होते.
मराठा सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी ब्रेक; सर्व्हर ठप्प, आठ दिवसांच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

राजा माने/मुंबई

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झाले असून मंगळवारपासून राज्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला घरोघरी जाऊन सुरुवात झाली आहे. अवघ्या आठ दिवसांत हे सर्वेक्षण संपवायचे आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सर्वेक्षणाला वेग आला. परंतु या सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी तांत्रिक विघ्न आले असून, अनेक ठिकाणी सर्वेक्षणाचे मोबाईल अ‍ॅपच बंद पडल्याने बराच वेळ सर्व्हर ठप्प होते. त्यामुळे वेगवान सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी ब्रेक लागला. त्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यात याचा फटका बसला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. मागासवर्गीय आयोगही कामाला लागले असून, मंगळवारपासून राज्यात घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षणही सुरू झाले आहे. राज्यभरात एकदाच हे सर्वेक्षण सुरू झाले. मात्र, काही ठिकाणी सर्वेक्षणाचे मोबाईल अ‍ॅपच बंद पडल्याने सर्वेक्षणाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. विशेषत: छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीत अचानक सर्व्हर बंद पडल्याने सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले. गोखले इन्स्टिट्यूटने हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अगोदर पूर्ण तयारी करण्यात आली होती. तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले होते. परंतु काही ठिकाणी मोबाईल अ‍ॅप बंद पडल्याने हा अडथळा निर्माण झाला. पहिल्याच दिवशी हा अनुभव आल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यासोबतच वेळेत सर्वेक्षण कसे होणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी प्रगणकांना मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सकाळी सर्वेक्षण सुरू होताच हे अ‍ॅप व्यवस्थित चालले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in