मराठवाड्यात टँकरची संख्या वाढता वाढे; विभागातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. सप्टेंबर अखेर विभागात १५७ गावे आणि १०३ वाड्यांना २९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिन्याभरातच ही संख्या दुप्पट झाली आहे. आजघडीला पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या विभागातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यात टँकरची संख्या वाढता वाढे; विभागातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मराठवाड्यात टँकरची संख्या वाढता वाढे; विभागातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

सुजित ताजणे /छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या असून पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. सप्टेंबर अखेर विभागात १५७ गावे आणि १०३ वाड्यांना २९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिन्याभरातच ही संख्या दुप्पट झाली आहे. आजघडीला पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या विभागातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. पावसाळा सुरू झाल्यावर टँकर बंद होतील, असे वाटत होते; परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जुलैअखेर पाऊस झाल्याने टँकरची संख्या कमी झाली होती. मात्र, पावसाचा खंड वाढल्याने पुन्हा टँकर सुरू करावे लागले. सध्या मान्सून संपत आला तरी विभागात पावसाची तूट ३८ टक्के आहे.

बीडची परिस्थिती गंभीर मराठवाड्यात ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात ३४ टँकरद्वारे तर धाराशिव जिल्ह्यात १२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. यात शासकीय टँकरची संख्या केवळ चार असून उर्वरित टँकर हे खासगी आहेत.

७३१ विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन हिंगोली, नांदेड हे दोन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार, एकूण ७३१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०, जालना ३७, परभणी १६, बीड ८१, लातूर २४१, तर धाराशिव जिल्ह्यातील २८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in