मार्क झुकेरबर्ग यांनी भारतावार कौतूकांचा वर्षावर केला आहे. त्यांनी भारताचा उल्लेख क जागतिक नेता असं केलं आहे. भारतीय लोक आणि कंपन्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आघाडीवर असल्याचं मत झुकेरबर्ग यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
व्हाट्सअॅप आणि फेसबुक आता मेटा कंपनीचा भाग आहेत. मार्क छुकरबर्ग हे या कंपनीचे सीईओ आहेत. मुंबईत आयोजित व्हॉट्सअॅप कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतावर कौतुकांचा वर्षावर केला आहे. WhatsApp vs PayU ECf Razorpay सोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केली. यामुळे व्हॉट्स अॅप वापरकर्त्यंना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI अॅप इत्यादीद्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळेल. तसंच झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपवर व्यवसायांसाठी व्हेरिफिकेशन सुविधा सुरु केली आहे. त्यांच्याकडे अनेक भारतीय कंपन्या अशा सुविधेची मागणी करत आहेत.
मार्क झुकरबर्ग यांनी या कार्यक्रमादरम्यान व्हॉट्सअॅप फ्लोज नावाचं एक नवं फीचर देखील सादर केलं. हे वैशिष्ट्य कंपन्यांना चॅट कस्टमाइझ आणि वैयक्तिकृत अमुमती देईल. त्यांनी एक उदाहरण देऊन हे वैशिष्ट्य स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी भारतीय लोक आणि कंपन्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आघाडीवर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केली.