रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचे लक्झरी डेव्हलपर मार्वल रिअलटर्स पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपले अग्रगण्य स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी सकारात्मक वाढीच्या मार्गावर आहे. गेल्या ३ वर्षांत १६०० उत्कृष्ट निवासस्थाने वितरीत केल्यानंतर, रिअल इस्टेट फर्म निवासी मालमत्तेसह पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या अधिक वाढीसाठी सज्ज आहे. मार्वलची गुंतवणुकीची ठिकाणे डिझाइनस, लेआउट्समुळे पुण्यातील सर्वात जास्त मागणी असलेल्या निवासस्थानांमध्ये नवीनतम भर पडणार आहे.
मार्वल निवासस्थाने बाजारातील मानकांपेक्षा ४० टक्के विस्तारित आहेत. मार्व्हल आर्को, हडपसरचे पुनर्विक्री मूल्य १०७ टक्के, मार्व्हल सेरिझ, खराडीचे अॅप्रेसिएशन रेट १०४ टक्के, मार्व्हल ब्रिसा, बालेवाडी १०० टक्के, मार्वल कास्काडा, बालेवाडी ८० टक्के आणि मार्वल सेल्वा रिज इस्टेट, बावधन ४५ टक्केने वाढले. सध्या पुण्यातील मार्वल पियाझा, विमान नगर, मार्वल सेल्वा रिज इस्टेट विला, बावधन, मार्वल ऑरम, कोरेगाव पार्क, मार्व्हल एक्वानास, खराडी, मार्व्हल दिवा अल्टिमा, मगरपट्टा रोड यासह ६ प्रतिष्ठित मार्व्हल मालमत्ता पुण्यातील प्रमुख ठिकाणी पझेशन घेण्यासाठी तयार आहेत.
कंपनीच्या वाढीच्या योजनांबद्दल बोलताना मार्वलचे सीईओ आणि अध्यक्ष विश्वजीत झावर म्हणाले की, या वर्षाच्या उत्तरार्धात, आम्ही पुण्यात सुमारे ५-स्टार स्टुडिओ अपार्टमेंट्ससारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहोत.