ठाकरे गटात तणाव निर्माण करणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून टाकल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. हे चिन्ह आणि पक्षाचे नाव वापरण्याची मुदत २६ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीनंतर ठाकरे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही. तसा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
हे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी किंवा नवीन नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी ठाकरे गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे जावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.