महाडच्या ब्लू जेट केमिकल कंपनीत भीषण आग ; व्हिडिओ व्हायरल

स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली
महाडच्या ब्लू जेट केमिकल कंपनीत भीषण आग ; व्हिडिओ व्हायरल

रायगडच्या महाडमधील एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत आज(३ ऑक्टोबर) रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. ब्लू जेट नावाच्या केमिकलची कंपनीला ही आग लागली होती. या कंपनीला लागलेल्या आगीत 11 कामगार अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यी कंपनीत गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महाडचे प्रांताधिकारी ताबोडतोब दाखल झाले आहेत.

ब्लू जेट ही हेल्थकेअर लिमिटेड कंपनी रायगडमधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत आज सकाळी 11 च्या जवळपास एक मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचा असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं. या स्फोटामुळे परिसरात सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला. याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आली नाही. मात्र, स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यावर इथं सगळीकडे आग पसरू लागली.

स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय पोलीसही दाखल झाले. या गॅसगळतीमुळे एका कामगाराची तब्येत अधिक बिघडल्याचं सांगण्यात येतं आहे.

दरम्यान, महाड आग दुर्घटनेमध्ये 11 जण अजूनही अडकून पडल्याची माहिती मिळाली आहे. तर पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. या कंपनीत 57 कामगार काम करत होते. अग्निशामन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल आहेत, अशी माहिती महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली होती

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in