पुण्यातील माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या ; नेमकं कारण काय?

मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
पुण्यातील माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या ; नेमकं कारण काय?

मनसेतून शिंदे गटात दाखल झालेल्या निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. त्यांनी पुण्यातील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

माझिरे यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केले होते. त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली असली तरी हा वाद नेमका कशाचा होता हे अद्याप समजू शकलेले नाही. माझिरे हे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुण्याचे धडाकेबाज नेते म्हणून त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझिरे हे मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक होते. पक्षांतर्गत कुरबुरीनंतर त्यांनी पक्ष सोडला. त्यांची हकालपट्टी झाल्याचे मनसेने जाहीर केले होते. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in