माथेरानची टॉय ट्रेन सुरू

माथेरान स्थानकात राणीचे आगमन झाले. यावेळी तिच्या स्वागतासाठी अनेक नागरिक उपस्थित होते.
माथेरानची टॉय ट्रेन सुरू

माथेरान : हिवाळ्याची चाहूल लागताच व सणासुदीचे दिवस जवळ आल्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा असलेली माथेरानची राणी शनिवारी रुळावर आली. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

माथेरान स्थानकात राणीचे आगमन झाले. यावेळी तिच्या स्वागतासाठी अनेक नागरिक उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता नेरळ स्थानकातून ही मिनी ट्रेन निघाली होती. ती माथेरान स्थानकात एक वाजता पोहोचली. यातून प्रौढ-९६ तर ५ लहान मुले अशा एकूण १०१ प्रवाशांनी पहिल्याच दिवशी प्रवास केला.

नेरळ-माथेरान-नेरळ या ट्रेनमध्ये विस्टाडोम बोगीसाठी प्रति प्रवासी ७५० रुपये, प्रथम श्रेणीसाठी ३४० रुपये, तर द्वितीय श्रेणीसाठी ९५ रुपये दर आहे. या गाडीचे अद्यापही आरक्षण होत नसल्याने गाडी सुटण्यापूर्वी पाऊणतास अगोदरच प्रत्येक प्रवाशाला चार तिकिटे उपलब्ध होऊ शकतात, असे रेल्वेने सांगितले.

मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे स्थानिक पर्यटनात वाढ होणार आहे. सध्या दोन गाड्या सुरू केल्या आहेत. त्या पर्यटकांच्या दृष्टीने अपुऱ्या असून सर्व पर्यटकांना याचा लाभ घेता येऊ शकत नाही. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने या फेऱ्यांत वाढ करणे गरजेचे आहे.

जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान

या ट्रेनमधून सफर आमच्या कुटुंबासोबत आनंदाने केली. डोंगर दऱ्यातील निसर्गसौंदर्य न्याहाळत असताना खूपच मस्त अनुभव आला आहे. खूप हळूहळू गाडी चालत असते त्यामुळेच या मार्गावर तीन तासांहून अधिक वेळ लागतो. त्यासाठी थोडा आणखीन वेग वाढविल्यास माथेरानला लवकर जाता येऊ शकते आणि हॉटेलमध्ये विश्रांती घेता येईल.

नित्यनाथ कासारे-पर्यटक, मुंबई.

वेळापत्रक

(अ) नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेन सेवा :-

नेरळ-माथेरान डाऊन गाड्या

नेरळ प्रस्थान ८.५० वाजता माथेरान आगमन ११.३० वाजता (दररोज)

नेरळ प्रस्थान १०.२५ वाजता माथेरान आगमन १३.०५ वाजता (दररोज)

माथेरान-नेरळ अप गाड्या

माथेरान प्रस्थान २.४५ वाजता नेरळ आगमन ५.३० वाजता (दररोज)

माथेरान प्रस्थान ४.०० वाजता नेरळ आगमन ६.४० वाजता (दररोज)

अमन लॉज-माथेरान-अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)

माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनिक)

माथेरान प्रस्थान ८.२० वाजता, अमन लॉज आगमन ८.३८ वाजता

माथेरान ९.१० वाजता अमन लॉज आगमन ९.२८ वाजता

माथेरान प्रस्थान ११.३५ वाजता अमन लॉज आगमन. ११.५३ वाजता

माथेरान प्रस्थान २.०० वाजता अमन लॉज आगमन २.१८ वाजता

माथेरान प्रस्थान ३.१५ वाजता अमन लॉज आगमन ३.३३ वाजता

माथेरान प्रस्थान ५.२० वाजता अमन लॉज आगमन ५.३८ वाजता

*(शनिवार/रविवारी)*

माथेरान प्रस्थान १०.०५ वाजता अमन लॉज आगमन १०.२३ वाजता

विशेष-४ माथेरान प्रस्थान १३.१० वाजता अमन लॉज आगमन १३.२८ वाजता

अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनिक)

अमन लॉज प्रस्थान ०८.४५ वाजता माथेरान आगमन ९.०३ वाजता

अमन लॉज प्रस्थान ०९.३५ वाजता माथेरान आगमन ०९.५३ वाजता

अमन लॉज प्रस्थान १२.०० वाजता माथेरान आगमन १२.१८ वाजता

अमन लॉज प्रस्थान १४.२५ वाजता माथेरान आगमन २.४३ वाजता

अमन लॉज प्रस्थान ३.४० वाजता माथेरान आगमन ३.५८ वाजता

अमन लॉज प्रस्थान ५.४५ वाजता माथेरान आगमन ६.०३ वाजता

अमन लॉज प्रस्थान १०.३० वाजता माथेरान आगमन १०.४८ वाजता

अमन लॉज प्रस्थान १३.३५ वाजता माथेरान वाजता १३.५३ वाजता

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in