विधानसभा निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकेल - शरद पवार

लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पार सुपडाच साफ होईल व महाविकास आघाडी विधानसभेच्या २८८ पैकी २२५ जागा जिंकेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार
शरद पवार
Published on

मुंबई : लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पार सुपडाच साफ होईल व महाविकास आघाडी विधानसभेच्या २८८ पैकी २२५ जागा जिंकेल, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पानिपत होईल असे कुणालाही वाटले नव्हते. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मते टाकून शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमूर्तीला जोरदार झटका दिला. आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सत्तर हत्तींचे बळ आले आहे असून, विधानसभेला महायुतीचा नामशेष होईल, असे शरद पवार म्हणाले.

माजी आमदार भालेराव यांचा पवार गटात प्रवेश

लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाय बी. चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

logo
marathi.freepressjournal.in