Jalgaon Suicide : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

जळगाव शहरातील मोतीनगर परिसरात राहणाऱ्या मयुरी गौरव ठोसर (२३) हिने सासरच्या छळाला कंटाळून १० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मयुरीचा विवाह १० मे रोजी जळगाव येथील गौरव ठोसर याच्यासोबत झाला होता.
Jalgaon Suicide : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Published on

जळगाव : जळगाव शहरातील मोतीनगर परिसरात राहणाऱ्या मयुरी गौरव ठोसर (२३) हिने सासरच्या छळाला कंटाळून १० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मयुरीचा विवाह १० मे रोजी जळगाव येथील गौरव ठोसर याच्यासोबत झाला होता.

मयुरीचा ९ सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त तिचा भाऊ तिला भेटून गेला होता. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी विविध कारणांवरून तिला छळण्यास सुरुवात केली होती. याच त्रासाला कंटाळून मयुरीने दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटना उघड होताच तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मयुरीचे आई-वडील व नातेवाईक जळगावला दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात बोलताना त्यांनी सासू, सासरे, दीर व नणंद यांच्यावर छळाचा आरोप करत गुन्हा दाखल करून अटक न होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in