
मुंबई : कल्याणमध्ये १५ ऑगस्टला मांस विक्रीचा वाद पेटला असताना आता मालेगाव आणि संभाजीनगरमध्येही मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात मांसविक्री बंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. हिंदू संघटनांकडून प्रशासनाला निवेदन देऊन अशी मागणी केली जात आहे. यामुळेच मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मांसविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
१५, २० आणि २७ ऑगस्टला पूर्ण दिवस सर्व प्रकारची मांसविक्री तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश मालेगाव महापालिकेने दिले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ १५ ऑगस्टला सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुस्लिमबहुल जिल्ह्यांत हा आदेश लागू करण्यात आल्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे.