वैद्यकीय अधिकारी घेणार आरोग्य संस्था दत्तक; सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची संकल्पना; आरोग्य सेवेचे बळकटीकरण, दर्जेदार आरोग्य सुविधा

राज्य सरकारच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरावरील आरोग्य संस्था दत्तक घेणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रथम नियुक्तीची आरोग्य संस्था दत्तक घेण्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे.
वैद्यकीय अधिकारी घेणार आरोग्य संस्था दत्तक; सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची संकल्पना; आरोग्य सेवेचे बळकटीकरण, दर्जेदार आरोग्य सुविधा
वैद्यकीय अधिकारी घेणार आरोग्य संस्था दत्तक; सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांची संकल्पना; आरोग्य सेवेचे बळकटीकरण, दर्जेदार आरोग्य सुविधा Freepik
Published on

गिरीश चित्रे / मुंबई

राज्य सरकारच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरावरील आरोग्य संस्था दत्तक घेणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रथम नियुक्तीची आरोग्य संस्था दत्तक घेण्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मोठ्या प्रमाणावर गट अ व ब तसेच विशेषज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून प्रशासकीय बाब म्हणून राज्यातील विविध ठिकाणी त्यांच्या पदस्थापना, पदोन्नती होत असतात. वैद्यकीय अधिकारी आपल्या सेवा काळात एकापेक्षा अधिक ठिकाणी सेवा बजावतात. राज्यातील आरोग्य व्यवस्थेमध्ये जनतेला क्षेत्रिय स्तरावर उपचारात्मक सुविधा देणाऱ्या आरोग्य संस्थांची जबाबदारी व महत्त्व मोठे असून विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू आहे. आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता व दर्जात्मक वाढ होण्याच्या उद्देशाने जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर संनियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

राज्यातील वाढत्या आरोग्य संस्था व त्या तुलनेत अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेता सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रथम नियुक्तीच्या आरोग्य संस्थेवर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या आधारे आवश्यक सोयी, सुधारणा व दर्जा वाढीसाठी योगदान दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण आरोग्य संस्था व त्यामार्फत जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर होणार आहे. यासाठी मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) यांच्या संकल्पनेतून विभागातील “वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या प्रथम नियुक्तीची आरोग्य संस्था दत्तक घेण्याची योजना” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in