MNS & BJP : अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात भेट ? नक्की काय शिजतंय ?

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असतानाच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली
MNS & BJP : अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात भेट ? नक्की काय शिजतंय ?

सध्याचे राज्याचे राजकारण हे सर्वसामान्य जनतेच्या कळण्याच्या पलीकडचे आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कोण कधी कोणत्या गटाचे आणि पक्षाचे असतील याबाबत सकाळी वृत्त हाती येईपर्यत संभ्रम असतोच. अशातच आता राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वजन पुन्हा एकदा जड होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असतानाच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थावर जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. मधेच त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा भगवा केला. शिंदेगटासोबत भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपचे संबंध वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याची चर्चाही दबक्या आवाजात केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in