मराठा आरक्षण 'सगेसोयरे' अध्यादेशासाठी आमदारांची भेट

२० फेब्रुवारी रोजीच्या विशेष अधिवेशनात आम्ही सगेसोयरे अध्यादेशासाठी मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान करावे
मराठा आरक्षण 'सगेसोयरे' अध्यादेशासाठी आमदारांची भेट

कर्जत : मराठा समाज आरक्षणाच्या सगेसोयरे या अध्यादेशासाठी संदर्भात चर्चा करून त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे, याकरिता मतदान करावे. या मागणीसाठी रायगड जिल्हा मराठा समाज समन्वयक व मराठा बांधवांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन निवेदन देऊन विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईन. ही घेतलेली शपथ पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू आहे. २० फेब्रुवारी रोजीच्या विशेष अधिवेशनात आम्ही सगेसोयरे अध्यादेशासाठी मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान करावे. अशी विनंती शिष्ठ मंडळाने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देऊन केली. या शिष्टमंडळात समन्वयक राजेश लाड, उदय पाटील, अनिल भोसले, उमेश म्हसे, कृष्णा घाडगे, जगदीश ठाकरे, रत्नाकर बडेकर, अरुण देशमुख आदींचा सहभाग होता.

logo
marathi.freepressjournal.in